तुळजापूर – तालुक्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीची शनिवारी (दि. २७) मा. अपर जिल्हाधिकारी धाराशिव यांनी शहापूर व दहीटणा गावांना भेट देवून पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांची विचारपूस करत प्रशासनाकडून तत्काळ मदतीचे आश्वासन दिले.

शहापूर गावाचा संपर्क पुलावर आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पूर्णतः खंडित झाला होता. मात्र पाणी ओसरू लागल्याने पुढील दोन ते तीन तासांत वाहतूक सुरळीत सुरू होईल, असे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दहीटणा गावात रात्रीच्या पावसामुळे दोन जनावरे वाहून गेली, तर एका जनावराचा वीज पडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पंचनामे करण्यात येत आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले. आज व उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. सर्वांनी सुरक्षित राहावे. कुठलीही अडचण आल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा,” अशा सूचना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. संततधार पावसामुळे यमगरवाडी पुलावरून पाणी वाहिल्याने गावाचा संपर्क काही काळासाठी तुटला. मंगरुळ सर्कलमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या पावसामुळे सोयाबीन व इतर पिके पाण्याखाली जात असून शेतकऱ्यांचे नुकसान वाढत चालले आहे.नैसर्गिक आपत्तीचा हा तडाखा दिवसेंदिवस गंभीर होत असून, प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती पावले उचलत आहे.


तिर्थक्षेञ तुळजापूरात शनिवार दिवसभर पावसाची संततधार चालु असल्याने याचा फटका भाविकांन  सह व्यापारी वर्गास मोठाबसला तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील जनजीवन या पावसामुळे विस्कळीत झाले होते. 

 
Top