धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील ठाकरे नगर नवरात्र महोत्सव 2025 च्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी श्री देवीजींच्या मुर्तीची व घटस्थापना स्थापना शुक्रवार दि.22 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीत महिला कार्यकारणी जाहीर करण्यात आली. 

या बैठकीत विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. तसेच विधीवत घटस्थापना, किर्तन, दांडिया, खेळ पैठणीचा, मेहंदी स्पर्धा, गालीचा रांगोळी प्रशिक्षण, रांगोळी स्पर्धा, डान्स स्पर्धा व राजस्थान येथील डॉक्टरांच्या टीमचे सलग सहा दिवस फिजिओथेरपी आरोग्य उपचार शिबिर यामध्ये डायबेटीस, बीपी, गुडघे दुखी यावर उपचार करण्यात येणार आहेत. तर नामवंत गायकांची आराधी गीते सादर होणार आहेत. या विविध धार्मिक कार्यक्रमासह दि.24 ते 30 सप्टेंबर दरम्यान फिजिओथेरपी उपचार करण्यात येणार आहेत. ठाकरे नगर येथे घेण्यात आलेल्या बैठकीस या महोत्सवाच्या मुख्य आधारस्तंभ श्यामल साळुंके आदींसह 200 महिलांची प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवानिमित्त कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवी मंदिरातून धाराशिव येथील ठाकरे नगरमध्ये शुक्रवार दि.22 सप्टेंबर रोजी देवींची ज्योत पायी आणण्यात येणार आहे. तर आदी शक्ती पिठातील देवींच्या मंदिरातील धानाचे वाण आणून घटस्थापना नायब तहसिलदार यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करुन करण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे नगर नवरात्र महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत साळुंके यांनी दिली आहे.


महिला कार्यकारणी

या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुरेखाताई खांडेकर यांच्यावर तर उपाध्यक्षपदी प्रतिभा गाडे व सचिवपदी सत्यशिला गायकवाड तर अन्य जबाबदारी या महिलांवर सोपवण्यात आली आहे.  योजना सलगर, पूजा वाघमारे, सुरेखा पवार, योगिता निलंगे, दीपाली गायकवाड, मिनाक्षी महामुनी, सत्यभामा खोत, रेखा शिंदे, लता राठोड, कोमल कदम, रुक्मिणी सुर्यवंशी, सीमा कदम, इंदू जगताप, सत्यशिला गायकवाड, उषा गायकवाड, राणी माळी, अरुणा झरकर, राणी माळी, विमल साठे, देडे ताई, अनिता पवार, अनारकली शिंदे, सीमा कदम, वर्षा डोके, निकिता सिरसट, शितल कसपटे, चौधरी, निता शेंडगे, उषा गायकवाड, मिनाक्षी महामुनी यांचा समावेश आहे. 

 
Top