वाशी (प्रतिनिधी)- शहरातील सर्वे नं. 4 मधील नागरिकांची दरवर्षीची यातना यंदाही तशीच उभी ठाकली आहे. घरात घुसलेले 8 ते 10 फूट पाणी, उध्वस्त संसार, बुडालेल्या वस्तू, लाखोंचे  नुकसान, अश्रू ढाळणारे व्यापारी आणि संकटात सापडलेले शेतकरीही विदारक दृश्ये डोळ्यासमोर असतानाही वाशी नगरपंचायतचे अधिकारी मात्र हातावर हात ठेवून निवांत बसले आहेत. असे म्हणत नागरिकांचा संयम आता संपला असून त्यांनी तहसीलदार व नगरपंचायतला निवेदन देत इशारा दिला आहे की,“तातडीने पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, घरातील व दुकानातील नुकसानभरपाई द्या, अन्यथा वाशी नगरपंचायत कार्यालयास टाळे ठोकू. गरज पडल्यास आमरण उपोषण व तीव्र आंदोलन करू.”

या निवेदनावर प्रवीण उंदरे, पद्मराज गपाट, अशोक रसाळ, प्रशोध भांडवले, किरण चौधरी, सतिश जुगदर, क्रांती फरताडे, समीर पाटील, सतिश पारडे, सुनीता गपाट, जयदत्त ढेपे, उमाशंकर विश्वेकर, सुनील साळुंखे, उल्हास पाटील, नारायण कारंडे, मनिषा गपाट, कविता कारंडे, प्रशांत उंदरे, लक्ष्मण पवार, गुलाम ख्वाजा पटवेकर, संदीप गादेकर, दिग्विजय पाटील, अशोक लावंड, सचिन मांडवे, शिवाजी उंदरे, बबन रणदिवे, आनंदराव कवडे, भारत उंदरे, गणेश गपाट, प्रवीण पवार, सुदर्शन देशमुख, अनिकेत कागदे, एस. पी. उंदरे, सौरभ जुगदर आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top