भूम (प्रतिनिधी)- केळीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूम तालुक्यातील वारे वडगाव येथील केळीच्या उध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग शासनाच्या मदतीची वाट पाहत आहे.
याबाबत सविस्तर असे की भूम शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तालुक्यातील वारे वडगाव येथे गेल्या तीन-चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातून वाहणाऱ्या रामगंगा नदीचे पात्र बदलल्याने गावातील हनुमान सुपेकर आश्रुबा करवंदे अनिल करवंदे व विनोद लाडाने यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांच्या जवळपास 200 कर केळीच्या बागा उध्वस्त झाले आहेत. यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर शेतकरी शासन केव्हा मदत देते याकडे वाट बघत आहेत. तसेच परंडा तालुक्यातील वाघे गव्हाणे येथील शेतकरी शरद कुलकर्णी यांचीही दोन एकर केळीची बाग या पावसामुळे मोडून पडलेली आहे. तेव्हा शासन यांना केव्हा मदत करणार याबाबत शेतकरी वाट बघत आहेत.