तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात हरित ऊर्जा निर्मिती कार्यरत असलेल्या सेरेंटिका रिन्यूएबल्स यांनी विशेष पाठबळ दिले. त्यानिमित्ताने प्रकल्पाचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट सुरजीत नारायण यांचा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या शुभहस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला. पत्रकार संघाच्या वतीने आयोजित महोत्सवात हा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या उदघाटन   सोहळ्याला  आ  कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, उमरगा येथील आमदार प्रविण वीरभद्रैया स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी मैनाक घोष, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक, सचिव रवींद्र केसकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.दोन दिवस चाललेल्या या महोत्सवास रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.


 
Top