मुरुम( प्रतिनिधी)- कदेर व कदेर परिसरातील,मुरळी याभागात मंगळवारी रात्रभर तसेच बुधवार (17 सप्टेंबर) रोजी पहाटे ३ ते सकाळी 7 पर्यंत ढगफुटीमुळे हाहाकार माजला होता मोठयाप्रमाणात आलेल्या पावसाने शेतातील सोयाबीन,उडीद,ऊस,तूर यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान प्रशासनाने तातडीने नुकसानीची पाहणी करावेत अशी मागणी कदेर तसेच परिसरातील भागातील शेतकऱ्यासह विविध राजकीय पक्ष आणि संघटनेच्यावतीने करण्यात येत असून याबाबत मंगळवारी व बुधवारी ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले,आलेल्या जोरदार पावससाने शेतीपिकाचे नुकसान मोठया प्रमाणात झाले आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.मुरूम मार्गे कदेर गुंजोटी उमरगा जाणारी बस गावाजवळील पुलावरून पाणी जात असल्यामुळे जागेवर सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत थांबून होती.वाहतूक सेवा 2 ते 3 तास बंद राहिली.


“अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे,उडीद,सोयाबीन पीक हातातून पूर्णपणे गेले आहे त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करून दिलासा द्यावा” — मनोज पाटील सामाजिक कार्यकर्ते


“अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे .ग्रामीण भागातील अनेक लोकांचे राहते दगडाच्या घरांच्या भिंतीचे पडझड झाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत त्यामुळे शासनाने तात्काळ मदत द्यावी”

— विजयकुमार बिराजदार ,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष व शेतकरी


“शेतीपिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आता आर्थिक समस्याला तोंड द्यावा लागणार आहे,पेरणीसाठी झालेला आर्थिक खर्च व त्यासाठी इतरांकडून घेतलेली रक्कम फेडावे कसे याची चिंता आहे म्हणून शासनाने तात्काळ मदत द्यावी”–दिलीप कांबळे,शेतकरी

 
Top