भूम (प्रतिनिधी)- चिंचवड - भूम एसटीमध्ये प्रवास करताना करमाळा तालुक्यातील कारले येथील प्रवाशांची चुकून राहिलेली बॅग सोने व इतर साहित्य भूमच्या वाहकाने समय सूचकता दाखवत भूम येथील बस स्थानकामध्ये परत केली.
सविता दादा कारले ता. तालुका करमाळा या प्रवासी महिला करमाळा ते परांडा प्रवास करत असताना सदरील बॅग विसरून परंडा येथे उतरल्या. त्यानंतर प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी भूम बस स्थानकामध्ये संपर्क साधला. सदरील वाहक अजय धुमाळ यांनी बॅग हस्तगत करून भूम येथे सदरील प्रवासीयांना बोलवून त्यांची बॅग व साहित्य त्यांना वापस दिले. प्रवासी कारले यांनी वाहक धुमाळ यांचे आभार मानले. यावेळी गणेश वाघमारे, नितीन मुळे आदी उपस्थित होते.
