धाराशिव (प्रतिनिधी)- अल्पवयीन पिडीतेवरील अत्याचार प्रकरणी सबळ पुरावा व अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून कळंब येथील जिल्हा सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी आरोपी विजय किसन तवले यास 21 वर्षाची शिक्षा व 6 हजार रूपये दंड अशी शिक्षा शनिवार दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील शेलगाव येथील सिमे हद्दीत दि. 29 जुलै 2021 रोजी सायंकाळी 5.30 वा. सु. शेलगाव ज. ता. कळंब शेत शिवारात घडली आहे.
सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी दि. 29 जुलै 2021 रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी ही त्यांच्या शेत शिवारातून लिंबाची फांदी आणते असे सांगून मोटार सायकल घेवून गेली. नंतर ती घरी आली नाही. आम्ही वाट पाहून फिर्यादीने व त्यांचे नातेवाईक यांनी मिळून तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. फिर्यादीचा त्यांच्या गावातील विजय किसन तवले (रा. शेलगाव ज., ता. कळंब) याने अज्ञात कारणासाठी पळवून घेवून गेल्या असल्याची फिर्याद पोलिस स्टेशन येरमाळा येथे दिली. यावरून गुरनं. 98/2021 कलम 363 भांदवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सपोनि दिनकर गोरे पोलिस स्टेशन येरमाळा यांनी करून सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी वापरत असलेला मोबाईलचा सीडीआर व एसडीआर काढून तपास केला. नमुद आरोपी हा पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीचा व पिडीतेचा शोध शिरोली ता. खेड, जि. पुणे येथे जावून घेतला. येथे आरोपी विजय किसन तवले व पिडीता मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. पिडीता हीस विचारपूस केली व जवाब नोंदविला. तिने आरोपीसोबत लग्न न करता पती-पत्नी सारखे राहून शारिरीक संबंध केले. तसेच आरोपी विजय किसन तवले यास पिडीता ही अल्यवयीन असल्याचे माहिती असताना तिला त्याच्या मोबाईल मधील पिडीतेचे व व तिच्या बहीणी सोबत काढलेले फोटो दाखवून तु सोबत आली नाही तर हे फोटा वायरल करेल असे म्हणून बळजबरीने पुणे तसेच शिरोली ता. खेड येथे नेहून तिच्या सोबत अत्याचार केला. त्यानंतर आरोपी विरूध्द कळंब सत्र न्यायालयात दोषारोपत्र सादर करण्यात आले.
सदरील प्रकरणी सरकार पक्षातर्फे 8 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडीतेची साक्ष महत्वपूर्ण ठरली. तसेच वैद्यकीय अहवाल, इतर साक्षीदारांचे जवाब व अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस 363, 376(3) भादवि तसेच बाललैगिंक अत्याचार कायद्या 2012 प्रमाणे कलम 3,4 (2) प्रमाणे कळंब येथील जिल्हा सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी आरोपी विजय किसन तवले यास 21 वर्षाची शिक्षा व 6 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.