धाराशिव (प्रतिनिधी)- शिवप्रतिष्ठान संस्था, साई पार्क सोसायटी, पद्मावती रोड,आळंदी देवाची,ता.खेड जि.पुणे या संस्थेचा प्रशांत शशिकांत मते यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार 2025 प्रशांत शशिकांत मते यांना जाहीर करण्यात आला.

हा पुरस्कार दिनांक 26/10/2025 रोजी सकाळी 11:00 वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर धर्मशाळा पद्मावती रोड, आळंदी देवाची , पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या शिव प्रतिष्ठान  पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असल्याचे शिव प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष श्री.मदनजी रेनगडे पाटील यांनी कळवले आहे.

 
Top