तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरात  ध्वनीप्रदूषण वाढविणारे डी.जे., साऊंड व लेझर फोकस लाइट्स यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

तुळजापूर शहरातील धार्मिक व सामाजिक वातावरण शांततामय ठेवण्यासाठी नागरिक आता स्वतःहून पुढाकार घेत आहेत. आवाज व प्रकाश प्रदूषणाविरोधातील हा लोकचळवळीचा सूर प्रशासनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे लहान मुलांच्या अभ्यासावर, वृद्धांच्या आरोग्यावर तसेच डोळ्यांच्या आणि कानांच्या तक्रारींवर गंभीर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा डी.जे. व लेझर वापरणाऱ्या गाड्यांना परवानगी देऊ नये. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या पुर्वी आपसिंगा ता. तुळजापूर येथे डीजेचा  आवाजाने सहा महिन्याचा बालकाला दवाखान्यात उपचार घ्यावे लागले.

याबाबत नागरिकांनी तुळजापूर पोलिस स्टेशनला एकत्रित निवेदन दिले असून, त्यावर उत्तम अमृतराव, भरत जाधव, बाळासाहेब कुतवळ,  मारुती  नाईकवाडी, प्रकाश हुंडेकर, कल्याण  भोसले, श्रीकांत वाघे, प्रताप सुरवसे सतिश दरेकर  अशोक सांळुके किसन  चव्हाण यांसह अन्य नागरिकांच्या सही आहेत.

 
Top