ढोकी (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील ढोकी, समुद्रवाणी,बेबंळी केशेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गटप्रवर्तक व आशा यांच्यासह तालुका आरोग्य कार्यालयातील कर्मचा-यांनी यांनी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम सन 2025-2026 अंतर्गत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया मध्ये आपण गाव पातळीवर आरोग्य विषयक विशेष उल्लेखनीय व उत्कृष्ट काम केल्याबद्दल याची दखल जिल्हापरिषद व आरोग्य विभागाने घेऊन शुकवार दि.15 स्वातंञदिनी प्रमाणपञ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये गटप्रवर्तक व आशा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा तथा ढोकी प्राथामिक आरोग्य केंद्राच्या गटप्रवर्तक रेखाताई गुंजकर-कदम,आशा सिंगल काळे,(सटवाई खोरी), यांनी 3 पुरुषाची नसबंदी शस्ञक्रियास प्रवृत केले ,समुद्रवाणी गटप्रवर्तक सुवर्णा कदम, कविता धनके,आशा ज्योती गोरे, यांनी 1 पुरुषाची , बेंबळी गटप्रवर्तक शाहीन शेख,आशा स्वाती कोळगे(रुईभर) एका पुरुषाची ,केशेगाव गटप्रवर्तक अंजेली चराटे,आशा संगिता मोरे(वडगाव) एक पुरुष असे 5 पुरुषाची नसबंदी शस्ञक्रियास प्रवृत करुन धाराशिव जिल्यात प्रथम सुरुवात केली. तसेच पुरुष नसबंदी कॅम्पचे आयोजन केल्याबद्दल तालुका आरोग्य सहाय्यक तानाजी क्षीरसागर,दिपक होटकर,तालुका सुपरवायजर सचिन टटाळे,ऑपरेटर संजय माने यांचा जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास , जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन जिल्हा परिषद धाराशिव येथे सत्कार करण्यात आला यावेळी तालुका आरोग्य आधिकारी डॉ प्रमोद गिरी यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या पुरुषांना पुरुष नसबंदी शस्ञक्रिया करायची असेल त्यांनी गावातील आशास्वंयसेविका यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका आरोग्य आधिकारी डॉ. प्रमोद गिरी यांनी केले आहे.