तुळजापूर (प्रतिनिधी)-  जिल्हाधिकारी कार्यालय धाराशीव यांच्याकडून तुळजापूर पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारसंघातील प्रभागनिहाय ग्रामपंचायत  यादी शुक्रवार रोजी  जाहीर करण्यात आली आहे.   गट गणात बदल नसुन आरक्षण  काय पडणार याची उत्सुकता इछुकांना लागली आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार करण्यात आलेल्या या विभागणीत ग्रामपंचायतीनिहाय सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे.असून आता जिल्हापरीषद  पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे

सिंदफळ गटात- सिंदफळ-आपसिंगा गण, काक्रंबा गटात- काक्रंबा, सलगरा दि. गण, जळकोट गटात- जळकोट, होर्टी गण, अणदूर गटात. अणदूर, चिवरी गण, मंगरुळ गटात- मंगरुळ, आरळीब्रुद्रुक गण, काटी गटात- काटी, सावरगाव गण, काटगाव गटात- काटगाव, तामलवाडी गण, शहापूर गटात- शहापूर, येवती गण, नंदगाव गटात- नंदगाव- खुदावाडी गण आहेत.

 
Top