भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे पिक व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे. अशी मागणी पक्ष पदाधिकारी यांनी केली असता तात्काळ दखल घेऊन पंचनामे केल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.  

तालुक्यातील ईट, वालवड, माणकेश्वर या सर्वच मंडळ क्षेत्रात या वर्षी मोठ्या प्रमाणात पावसाची अतिवृष्टी झाली, यामध्ये शेतातील पिकाची व शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली, चाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पक्ष पदाधिकाऱ्यांनी शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी केली . यावेळी . घुलेवाडी नळी वडगाव, गिरलगाव आदी गावाचे बांधावर जाऊन  पाहणी केली,  यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 

भाजपा भूम तालुका सरचिटणीस  रघुनाथ वाघमोडे यांच्या पत्रावर नायब तहसीलदार भूम यांना निवेदन दिले. होते. यावेळी भूम तालुका अध्यक्ष संतोष  सुपेकर यांनी त्या ठिकाणच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ पंचनामे करा अशी विनंती केली असता, नायब तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेऊन तेथील अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले. शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी संबंधित अधिकारी यांनी तेथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली व पंचनामे केली. यावेळी स्वतः भाजपा तालुका सरचिटणीस रघुनाथ वाघमोडे हे लक्ष ठेवून होते.

 
Top