तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर - नळदुर्ग रस्त्यावर तिर्थब्रुद्रक येथील नागोबा मंदीर समोर बसला अचानक आग लागली. माञ स्थानिक व नगरपरीषद अग्निशमन दलाचे वाहन येवुन त्यांनी आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. यात जिवित हानी झाली नाही. या बस मध्ये मोठ्या संखेने प्रवासी असल्याचे समजते. सदरील घटना शनिवार दि 23 रोजी दुपारी 01.30वा सुमारास घडली.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, तुळजापूर बसआगाराची बसक्रमांक एमएच 20 बीएल 4236 ही बस निलेगाव हुन तुळजापूरकडे येताना तिर्थब्रुद्रक येथील नागोबा मंदीरा जवळ आली असता अचानक केबिन मधुन धुर येवुन ती पेटली. स्थानिक मंडळीनी बसमधील प्रवासी खाली उतरवले. विशेष म्हणजे तिर्थब्रुद्रक येथील ग्रामदैवत श्रीनागोबाची याञा आज होती. यावेळी स्थानिकासह तुळजापूर नगर परीषद अग्नीशमन वाहनाने आग विझवली. यावेळी आग लागलेल्या एसटी शेजारी नागोबा मंदीर असुन आज शनीअमावस्या असल्याने येथे आलेल्या भक्ताचे शेकडो वाहने होते. आग लागल्याचे समजताच याञेसाठी आलेल्या भक्तांमध्ये घबराहट पसरली. अखेर अग्नीशमन दलाने घटनास्थळी येवुन, त्यांनी तात्काळ आग विझवल्याने तेथील भक्तांनी सुटकेचा श्वास सोडला. यावेळी या रस्त्यावरील वाहतुकं काही काळ विस्कळीत झाली होती. सदरील एसटी पेटली कशी याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. माञ चलती बस पेटणे घटनेने एसटी व प्रवासी सुरक्षा प्रश्न पुन्हा चर्चत आला आहे.