उमरगा (प्रतिनिधी)-  सकल मातंग समाज उमरगा च्या वतीने साहित्य संपदेतून सामाजिक जाणीवांना शब्दबद्ध करणारे थोर साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्र सह कामगार चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असणारे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 105 वी जयंती दि.1 ऑगस्ट 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी ध्वजारोहण उमरगा व लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिमा पूजन उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी, उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, उमरगा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख, धाराशिव समाज कल्याण विभागाचे माजी सभापती हरीश डावरे आदींच्या हस्ते करण्यात करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख बळी सुरवसे, रणधीर पवार, दिलीप गायकवाड, शौकत पटेल, सिद्धेश्वर माने, शिवाजी गायकवाड, संजय सरवदे, संजय कांबळे, भागवत गायकवाड, वर्षाताई कांबळे, गोजरबाई बनसोडे यांची उपस्थिती होते. बालाजी गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विविध मागण्या मांडल्या.आजी व माजी दोन्ही आमदारांनी पुतळा उभारणे व समाजाच्या मागण्या बाबत सकारात्मक विचार करत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय कोथळीकर यांनी मांडले. उमरगा तालुक्यातील सकल मातंग समाज व बहुजन समाज बहुसंख्येने व सर्वपक्षीय व सर्व उपस्थित होते.

 
Top