भूम (प्रतिनिधी)- श्री संत रोहिदास महाराज यांच्या मंदिराचे भूमिपूजन संपन्न दिनांक 21.8.2025 रोजी सकाळी अकरा वाजता भैरवनाथ शुगर कारखान्याचे धनंजय सावंत यांच्या शुभहस्ते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रवीण रणबागुल मराठवाडा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हे हजर होते. तसेच आजिनाथ राऊत जिल्हाध्यक्ष धाराशिव नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस सदस्य उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती भूम हे हजर होते. यावेळी प्रवीण रणबागुल यांनी उपस्थित चर्मकार बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच बाळासाहेब पाटील यांनी देखील भाषण केले. यावेळी धनंजय सावंत यांनी या रोहिदास महाराज यांच्या मंदिराच्या बांधकामा समोर गार्डन बगीचा साठी पाच लाख रुपये देण्याचे घोषित केले. यावेळी मोठ्या संख्येने चर्मकार समाज उपस्थित होता. यावेळी दादा रामगुडे, संतोष शिंदे,महादेव शिंदे, कुंडलिक रामगुडे, गोकुळ रामगुडे, बिरमल रामगुडे, अनिकेत रामगुडे, बालाजी रामगुडे, मन्मथ रामगुडे, बाबा रामगुडे, सनी रामगुडे, भाग्यवान रामगुडे, रणजित रामगुडे, निलेश टेकाळे, नरेंद्र रामगुडे, रवींद्र लोमटे, करण रामगुडे सर्व उपस्थित होते.