कळंब (प्रतिनिधी)- शिर्डी येथे छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र एशियन श्री साई सोशल आर्ट अवार्ड दि. 17 ऑगस्ट धर्मवीर छत्रपती संभाजी राजे इंटरनॅशनल ऑफ द इयर 2025 पुरस्कार प्रा. डॉ. श्रीराम ज्ञानोबा मुळीक यांना सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यास खासदार भाऊसाहेब वाकचौरे व अभिनेते विजय पटवर्धन व प्राचार्य डॉ. शिंदे त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. श्रीराम मुळीक हे मूळचे खोंदला ता .कळंबचे रहिवाशी असून गेली वीस वर्षापासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहे. याची दखल घेऊन दि. 24 ऑगस्ट रोजी लातूर येथे यंदाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रा. डॉ. श्रीराम ज्ञानोबा मुळीक हे मानकरी ठरले ते सध्या वाशी येथील गुरुकुल मध्ये विद्यार्थी घडवत आहेत. गेल्या वीस वर्षापासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अद्वितीय कार्य करीत आहेत आतापर्यंत वेगवेगळ्या सामाजिक संस्था नी 18 पुरस्काराने गौरवण्यात आले पुरस्काराचे वेळी प्रमुख उपस्थिती लेखक डायरेक्टर योगीराज माने ॲड. कस्तुरे व देवानंद व प्राचार्य खामेसर यांची उपस्थिती होती.या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
