कळंब (प्रतिनिधी)- येथील पोलीस ठाणे यांच्या वतीने दि. 30 ऑगस्ट रोजी कळंब तालुका व शहरात साजरा होणाऱ्या गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणानिमित्त दंगा काबु पथक यांची रंगीत तालीम छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे घेण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांनी सार्वजनिक सणांमध्ये डीजे वापरता येणार नाही. अक्षेपआर्यअसे पोस्टर लावण्यात येऊ नये, अफवावर विश्वास ठेवू नका, नियमाचे पालन करावे व सर्व समाजाने येणारे सण हे शांततेत साजरे करावेत त्याचप्रमाणे गणेश मूर्तीचे संवर्धन करावे असे आव्हान पोलीस प्रशासनातर्फे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे. यावेळी हे पतसंचलन होळकर चौक, बागवान चौक, सराफ लाईन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक, जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा रुटमार्च घेण्यात आला. सदर रुटमार्चसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, 04 पोलीस अधिकारी, 18 पोलीस अंमलदार, 01 आरसीपी प्लाटुन, 16 होमगार्ड हजर होते.
