धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील भांडगाव व सिरसाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावून उभे केलेले पिक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे अनेकांचे उत्पन्न कोलमडले असून शेतकरी चिंतेत आहेत. असे प्रतिपादन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले.
यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या व त्यांना धीर दिला. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच अनेक ठिकाणचे बंधारे वाहून गेल्याचे देखील पाहणीत आढळून आले. यावेळी सदर बंधाऱ्याचा अहवाल संबंधित विभागास पाठवावा व बंधारे दुरुस्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ एका वर्गाचा नसून संपूर्ण समाजाच्या उदरनिर्वाहाचा आधार असल्याने शासनाने संवेदनशीलतेने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे ही काळाची गरज असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. या नुकसानीची पाहणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.
यावेळी जिल्हाप्रमुख रणजित दादा पाटील, तालुकाप्रमुख मेघराज दादा पाटील, तहसीलदार निलेश काकडे, कृषी अधिकारी लांडगे साहेब, उपशहरप्रमुख उमेश परदेशी, तसेच बुद्धिवान लटके, अभिजीत चोबे, बालाजी चोबे, अनिल पाटील, धनंजय जाधव, संजय पवार, अनंत जाधव, वसंत मिसाळ, युवासेना सर्कल प्रमुख रंजीत संजय अंधारे, माजी सरपंच चंद्रकांत अंधारे, माजी उपसरपंच बापूसाहेब शिंदे, संतोष हनुमंत अंधारे, युवराज भोसले, अतुल अंधारे, बालाजी अंधारे, सुधीर अंधारे, मनोज अंधारे, रोहन अंधारे, अण्णा धस, नागेश भोसले, नितीन अंधारे आदी मान्यवर उपस्थित होते.

