तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवार दि20 ऑगस्ट रोजी विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत घोडके, पर्यवेक्षक डॉ. पेटकर, सुनील चव्हाण, राजेश बिलकुले यांच्या हस्ते देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात करण्यात आल्यानंतर सदभावना प्रतिज्ञा घेवुन सदभावना दिन साजरा करण्यात आला. सदभावना दिनाचे महत्व दिलीप सलगर यांनी सांगितले. यावेळी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.