उमरगा (प्रतिनिधी)- शिक्षण हे देशातील सर्वांगीन विकासाचा केंद्रबिंदू असून प्रथम संस्थेने देशातील शैक्षणिक क्षेत्रात नाविण्यपूर्ण संशोधन करून विकास केला. असे मत श्रमजीवी डि एड कॉलेजचे प्राचार्य भिमाशंकर सारणे यांनी व्यक्त केले.
शहरातील बहुजन हिताय वसतीगृहाच्या निसर्गसुंदर परिसरात प्रथम एज्युकेशन फांउडेशन मुंबई प्रथम क्रीयेटीव्ह क्लब विभाग शाखा किल्लारी तर्फे तालुक्यातील युवक, युवतीसाठी दोन दिवशीय युवा कौशल्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य सारणे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत प्रज्ञाजीत हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट अभिनेते विक्की चव्हाण, डॉ. अभिषेक बनसोडे, प्रा. धनराज होळमूजगे, सामर्थ्य कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा बबीता राठोड, प्रथम संस्थेच्या प्रशिक्षीका अनिता निकटे हे उपस्थित होते.
यावेळी चित्रपट अभिनेते विक्की चव्हाण, बबीता राठोड, प्रा. होळमुजगे, डॉ बनसोडे व प्रज्ञाजीत यांनी शिबीरार्थींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शिबीरार्थी ज्योत्सना माने, जोया पठाण व शिवानी शिरशे यांनी आपल्या मनोगतातून समाधान व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 65 शिबीरार्थी यांना प्रमाणपत्र देण्यात आले. शिबीरातील प्रशिक्षणार्थीना प्रथम संस्थेचे विभाग प्रमुख संतोष गुंजोटे व अनिता निकटे यांनी प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा संपर्क अधिकारी सुमीत कोथिंबीरे यांनी केले. प्रास्ताविक मेंटर लिडर लक्ष्मण मंडाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन नितेशराजे धुरवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास तालुक्यातील असंख्य युवकासह प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने हजर होते.