कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि अँटी रॅगिंग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रॅगिंगला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने  आठवडाभर अँटी रॅगिंग सप्ताह राबवण्यात आला. या अंतर्गत 12 ते 18 ऑगस्टदरम्यान महाविद्यालयात विविध उपक्रम राबवले गेले. दिनांक 20 ऑगस्ट रोजी अँटी-रॅगिंग,सायबर गुन्हेगारी आणि महिला सुरक्षा या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

याप्रसंगी प्रथम सत्रात  ॲड. एस. आर.आगलावे यांनी रॅगिंगविरोधी कायद्यांची माहिती आणि तक्रार निवारण प्रक्रिया ,रॅगिंगचे दुष्परिणाम आणि त्यावर मात करण्यासाठी उपाययोजनांची माहिती दिली ,दुसऱ्या सत्रात प्रभा पुडंगे सहा.पोलिस उपनिरीक्षक ,कळंब यांनी सायबर गुन्हेगारीचे प्रकार, महिलांवरील परिणाम,कायदेशीर उपाय,महिलांसाठी सुरक्षा,जागरूकता,याबदल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे आयोजन. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.अर्चना मुखेडकर, अँटी रॅगिंग समिती सदस्यडॉ.दत्ता साकोळे, डॉ.मीनाक्षी जाधव, डॉ.विश्वजीत म्हस्के, यांनी केले तसेच कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. गुंडरे , डॉ.अंकुशराव  , एनसीसी ऑफिसर बोंदर मॅडम यांनी केले , याप्रसंगी अँटी रॅगिंग समितीचे चेअरमन तसेच संस्थेचे संचालक डॉ. संजय कांबळे नवागत विद्यार्थ्यांना सुरक्षित महाविद्यालयीन जीवनाची हमी दिली.कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान सर यांनी या रॅगिंगविरोधी जागृतीपर कार्यशाळेत सर्वअभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना रॅगिंगबाबत सजग करीत महाविद्यालयीन कार्यकाळात  महाविद्यालयाच्या प्रशासनाद्वारे पूर्ण सुरक्षितता प्रदान करण्याची हमी देण्यात आली.

तसेच मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले त्यामध्ये निबंध स्पर्धा,स्लोगन, लोगो, भाषण, पोस्टर प्रेझेंटेशन, पथनाट्य स्पर्धा इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेमध्ये 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.विजेत्यांची नाव डॉ.जाधव यांनी जाहीर केले.या कार्यशाळेचे प्रथम सत्राचे सूत्रसंचालन डॉ. साकोळे,आभार. डॉ.म्हस्के यांनी केले. यावेळी डॉ. दीपक सूर्यवंशी, डॉ.राठोड, डॉ.भोसले, डॉ. सावंत, प्रा. दळवी, डॉ.सरवदे, डॉ.लोहकरे ,डॉ. चांदोरे ,प्रा.बालाजी राऊत,श्री.अरविंद शिंदे,प्रा.गोविंद फेरे, प्रा.बाळासाहेब बाबर,  प्रा.संदीप देवकते, प्रा .प्रताप शिंदे, प्रा. अर्चना पाटील, प्रा .ज्योती टीपरसे, प्रा.प्रणिता खोसे, कार्यक्रमासाठी वरिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि  200 विद्यार्थी  उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी अधीक्षक हनुमंत जाधव, इकबाल शेख, जया पांचाळ,संदीप सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.


 
Top