तुळजापूर (प्रतिनिधी)- बैलांसाठी कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण शुक्रवार दि. 22 ऑगस्ट रोजी बळीराजाने उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला.
सांयकाळी मंदीरात बैलजोडी नेऊन महंत वाकोजीगुरुतुकोजीबुवा यांच्या हस्ते बैलजोडीचे पूजन करण्यात आले. माजी मंञी मधुकर चव्हाण यांनी आपल्या अणदुर गावी बैलाचे पुजन करुन बैलपोळा सण साजरा केला. या निमित्ताने सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांना आकर्षक सजावट केली होती. गावोगाव सजविलेल्या बैलजोड्या गावचा मारुती मंदिरात नेऊन नारळ फोडून पूजन केले गेले. त्यानंतर शेतकरी कुटुंबांनी बैलजोडी व गाईचे पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य घालून आनंदाने बैलपोळा साजरा केला.