भूम (प्रतिनिधी)- राज्य परिवहन महामंडळाचे चालक सलीम मुसाखान पठाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त भूम आगाराच्यावतीने सत्कार करण्यात आला.

नेहरूनगर कुर्ला येथे 1999 मध्ये सेवेला सुरुवात केली होती. 26 वर्ष विना अपघात सेवा बजावण्यात आली. वेळोवेळी डेपोकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. 31 जुलै रोजी भूम आगारातील वाहक चालक यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम भूम आगारामध्ये आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सलीम मुसाखान पठाण र्याचाही सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी डेपो मधील वाहक चालक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top