तुळजापूर (प्रतिनिधी)- समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री नारायण नन्नवरे यांच्या वतीने फिनिक्स फाउंडेशन व समर्थ पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने ने सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबारात 430 रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शनिवार दि.02ऑगस्ट 2025रोजी तुळजापूर शहरातील शिवपार्वती मंगल कार्यालयात सर्व वयोगटातील 430 महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.
रक्तदान शिबिरात 55 रक्तदात्यांचे रक्तदान
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात शहरातील महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्सरममर्थ पतसंस्था व फिनिक्स फाउंडेशन मागील 20 वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करतात त्यात त्यांनी जवळपास 1700 बाटल्या रक्तसंकल केले आहे.
आयुष्यमान भारत कार्ड वितरण
केंद्र सरकारने नागरिकांसाठी लागू केलेली जनतेसाठी अतिशय लाभदायक असलेली आयुष्मान भारत ह्या योजनेचे जवळपास 250 लाभार्थ्यांचे ई केवायसी पूर्ण करण्यात आल्या असून, नोंदणीकरण झालेल्या नागरिकांना नोंदणीकरणानंतर काही दिवसांतच टिकाऊ स्वरूपाचे कार्ड विनामूल्य देण्यात येणार असल्याची माहितीही या वेळी फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली.
देहदान व अवयवदान जनजागृती
शबिरात देहदान व अवयव दानाबद्दल जनजागृती करण्यासाठी अवयवदानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने स्वतंत्र कक्ष उभरण्यात आला होता या मध्ये तुळजापूर येथील रवींद्र महादेव भालेकर यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला व त्याबाबतची सर्व ती प्रशासकीय कागदोपत्री प्रकिया पूर्ण केली. शहरातील नेताजी नगर, समर्थ नगर, तुळजाई नगर, घोडके प्लॉटिंग,शिवरत्न नगर,अपसिंगा रोड शिक्षक कॉलनी या भागातील लोकांना आरामदायीपणे बसता यावे यासाठी 30 सिमेंटच्या बेंचची मांडणी करण्यात आली कार्यकमाचे प्रास्ताविक सज्जन जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन अजिंक्य नन्नवरे यांनी मानले.
