भूम (प्रतिनिधी)- शंकरराव कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, भुम यांच्या वतीने “ध्वनी प्रदूषणाला नाही म्हणूया” हा संदेश देण्यासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात आला.

रॅलीच्या प्रारंभी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत साहेब तसेच पोलीस दलातील कर्मचारी उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष शिंदे सर, पर्यवेक्षक श्री आर. डी. सोळुंके, क्रीडाशिक्षक श्री महेश सूर्यवंशी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी रॅलीत उत्साहाने सहभागी झाले. या रॅलीत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून ध्वनी प्रदूषणामुळे होणारे आरोग्य व पर्यावरणीय दुष्परिणाम स्पष्ट केले तसेच नागरिकांना कमी आवाजात सण-उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले.

 
Top