तुळजापूर (प्रतिनिधी)-  मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुंबई आरक्षण मोर्च्यासाठी तुळजापूर शहरासह ग्रामीण भागातून असंख्य मदतीचे हात पुढे येत आहेत. याचा प्रत्यय शारदा मंगल कार्यालयात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत आला. विशेष म्हणजे ऐरव्ही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे निर्णायक बैठकीला सर्वच पक्षातील मराठा युवा नेते या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. 

बैठकीच्या प्रारंभी महेश गवळी यांनी मागील आंदोलनाचा पै-पैचा हिशोब सादर केला. त्यानंतर मराठा बांधवांनी “पैशांची गरज नको, आम्हाला फक्त सांगा आम्ही लोक घेऊन हजर होऊ” असा ठाम निर्धार व्यक्त केला.

आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष यांना आपल्या प्रभागातील मराठा बांधवांना सोबत घेऊन मोर्च्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. जाण्या-येण्याची तसेच खाण्यापिण्याची जबाबदारी स्विकारण्याची तयारीही असंख्य युवक नेत्यांनी दर्शवली.

यावेळी स्पष्ट करण्यात आले की, जो कोणी मराठा आरक्षण लढ्यात खऱ्या अर्थाने सहभागी होईल, त्यालाच समाजाची साथ मिळेल. मुंबई मोर्चासाठी निघणाऱ्या प्रत्येक गाडीची नोंद मराठा सेवक करतील. शेवटी “मराठा खडा तो सरकार से बडा” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले आणि या निर्णायक बैठकीचा सांगता झाला.

 
Top