धाराशिव (प्रतिनिधी)- माहूर येथील श्री बालाजी मंगल कार्यालयात संस्कार भारती देवगिरी प्रांताची 23 व 24 ऑगस्ट रोजी सर्व साधारण सभा उत्साहात संपन्न झाली. उद्घाटन सत्रात डॉ. कवठेकर, संस्कार भारती केंद्रीय मंत्री रविंद्र बेडेकर, पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे , प्रांत कार्याध्यक्ष भगवान देशमुख ,प्रांतअध्यक्षा प्रा. स्नेहल पाठक, प्रांत महामंत्री डॉ.जगदीश देशमुख यांच्याहस्ते उद्घाटन संपन्न झाले. 

त्यानंतर सांस्कृतिक कार्याक्रमात प्रांत मंचीय संयोजक जयंत शेवतेकर यांच्या नेतृत्वाखाली किनवट समिती बंजारा नृत्य, आदिवासी नृत्य, धाराशिव जिल्हा समितीच्या वतीने गोंधळ आदि समितीचे सादरीकरण करण्यात आली. दुसऱ्यादिवशी सकाळ सत्रात संगीत मैफिल विश्वनाथ दशरथे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. त्यानंतर सत्रात कलाध्यापक रणजीत दत्त वर्मा यांच्या चित्र प्रदर्शनाचे मान्यवरांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यानंतर कार्यकर्ता संघटन व आगामी काळातील कार्यक्रमा बाबत, कोषवाढीबाबत चंद्रकांत घरोटे व रविंद्र बेडेकर यांनी बौद्धिक मार्गदर्शन केले. प्रांत अहवाल महामंत्री डॉ. जगदीश देशमुख तर प्रांत कोष अहवाल ॲड.संजय घायाळ व डॉ. सतिश महामुनी यांनी वाचन केले. याच सभेत प्रांतातील पदाधिकारी, सदस्य यांनी उल्लेखणीय कार्याची समाजानी दखल घेऊन सन्मानित केल्याबद्दल प्रांताच्या वतीने सर्वांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रभाकर चोराखळीकर , प्रमोद वझे, वैशाली गोस्वामी कुलकर्णी, धनंजय पटवारी यांनी सत्रनिहाय सुत्रसंचालन केले तर उद्घाटन सत्र शेषनाथ वाघ व समारोप सत्र डॉ.मार्तंड कुलकर्णी यांनी सभेसाठी सहकार्य केलेले गोपाळ महामुने , प्रशांत राठोड ज्ञात अज्ञात मान्यगणांचे आभार मानले वैयक्तिक पद्य जनार्दन तळीखेडीकर व मुकुंद मिरगे यांनी म्हणाले या सभेसाठी साठी प्रांतातील 13 जिल्हातून व 7 महानगर समिती पदाधिकारी सदस्य कला साधकाच्या उपस्थित उत्साहात सभा संपन्न झाली . संतोष बीडकरांच्या संपूर्ण वंदेमातरम ने सभेची सांगता झाली या सभेसाठी प्रांत उपाध्यक्ष देवेंद्र कुलकर्णी, सहमहामंत्री डॉ. सतिश महामुनी, दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ, छायाचित्र संयोजक पद्माकर मोकाशे नांदेडचे अरविंद देशमुख, जयंत वाकोडकर, अंजली देशमुख, धाराशिव जिल्हा समिती संरक्षक प्रभाकर चोराखळीकर,अध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, उपाध्यक्ष प्रफुलकुमार शेटे, सचिव दिपक महामुनी, सहकोषप्रमुख अविनाश धट,संगीत प्रमुख सुरेश वाघमारे, संदीप रोकडे, भुअंलकराण प्रमुख लक्ष्मीकांत सुलाखे, मातृशक्ती प्रमुख सअपर्णा शेटे,सौ.महामुनी, अजय राखेलकर आदि मान्यगण पदाधिकारी कला साधक उपस्थित होते.


 
Top