तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील दयावान युवा मंचाने यंदा ‌‘बेटी बचाव, बेटी पढाव' ही संकल्पनेवर आधारीत गणेश मुर्ती प्रतिष्ठापना केली आहे. मंगळवार सकाळी  छञपती शिवाजी महाराज चौकात आमदार राणाजगजितसिंह पाटील, विनोद गंगणे, मिथुन पोफळे, आनंद कंदले यांच्या उपस्थितीत पुजन आरती करुन मिरवणूकीस आरंभ झाला. यात हजारो सुवासनी महिला सहभागी झाल्या होत्या.

वर्गणी मुक्त गणेश उत्सव हे मंडळ संस्थापक अध्यक्ष मिथुन पोफळे नेतृत्वाखाली साजरी करते. यंदा या मंडळाचे अध्यक्ष अपेक्षित साखरे, उपाध्यक्ष निखील इगवे, कोषाध्यक्ष विनायक वाघमारे, सहकोषाध्यक्ष अभिजीत जाधव व कार्याध्यक्ष कुणाल रोंगा, दादाराव गोरे सह सदस्य मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी  परिश्रम घेत आहेत.

 
Top