धाराशिव (प्रतिनिधी)- नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ‘At Home Reception’ या प्रतिष्ठित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,धाराशिवचे युवा संशोधक व दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ.शुभम धूत यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कार्याचा विशेष गौरव केला.
आयुर्वेद क्षेत्रात अभिनव संशोधन करणारे डॉ.धूत यांनी हिमोफिलिया या दुर्धर आजारावर जगातील पहिले आयुर्वेदिक औषध ‘रक्तामृत वटी’ विकसित केले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सर्वोच्च नेतृत्वाकडून मिळालेला हा सन्मान केवळ डॉ.धूत यांचाच नव्हे,तर संपूर्ण धाराशिव जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.हा गौरव भावी वैज्ञानिक संशोधन व प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरेल.