कळंब (प्रतिनिधी)- डॉक्टर चंद्रशेखर हिवरे यांची उस्मानिया विद्यापीठाच्या पदवित्तर प्राणी शास्त्राच्या अभ्यास मंडळावर निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर हिवरे हे यापूर्वी कळंब येथील मोहेकर महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभाग प्रमुख होते.
डॉक्टर हिवरे यांना उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद यांच्याकडून दोन वर्षासाठी विषय तज्ञ म्हणून अभ्यास मंडळावर घेतल्याचे नियुक्तीपत्र दिले आहे. या पूर्वी डॉक्टर हिवरे यांनी माजी वरिष्ठ प्राध्यापक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख लोकपाल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या रेशीम उद्योगाचे संचालक म्हणूनही तीन वर्षे जबाबदारी सांभाळली. होती डॉक्टर हिवरे यांनी बावीस विद्यार्थ्यांना पदवी प्रधानासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी आतापर्यंत 153 शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांची चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक दादा मोहेकर यांच्यासह सर्वांनी अभिनंदन करून कौतुक केले.