तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आपसिंगा येथील जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेत अनियमिततेचे गंभीर आरोप होत असून, तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सरपंच अजित क्षिरसागर यांनी मुख्य अभियंता म जि प्रा कार्यालय संभाजीनगर यांना निवेदन देवुन केली आहे.
सदरील निवेदन दखल मुख्य अभियंता छञपतीसंभाजीनगर कार्यालयाच्या मनीषा पलांडे यांनी घेवुन आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करुन सदरील अहवाल कार्यालयास सादर करण्याचे पञ अधीक्षक अभियंता म जि प्रा लातुर यांना दिले आहे. या चौकशीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, योजनेतील अनेक कामे तपासणीत नियमांचे उल्लंघन करत करण्यात आली असून, त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदरील कामाचे बिल थांबविण्याची मागणी सरपंच क्षिरसागर यांनी केली आहे.