तेर( प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील उपळा (मा )येथील अंगणवाडी पर्यवेक्षिका जोत्सना सोनवणे सेवानिवृत्त झाल्याबद्दल तेर येथे सत्कार करण्यात आला.
तेर येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी मनीषा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका वसूदा कुलकर्णी, कल्पना मोहीते व अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस उपस्थित होते.