तेर (प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे  तहसील कार्यालय धाराशिव व मंडळ अधिकारी कार्यालय विभाग तेर यांच्या वतीने संयुक्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.          

 शिबीराचे उद्घाटन तहसीलदार  डॉ.मृणाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तगर अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे,तेरच्या सरपंच दीदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे,माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, पोलिस पाटील फातेमा मनियार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.यावेळी तेर विभाग मंडळ अधिकारी शरद पवार ,तेर ग्राम महसूल अधिकारी प्रशांत देशमुख , हिंगळजवाडीचे ग्राम महसूल अधिकारी हिंगळजवाडी राहुल बेशीकराव,किणीचे  ग्राम महसूल अधिकारी शंकर ईपर,काजळाचे ग्राम महसूल अधिकारी वर्षा मुळे,कोळेवाडीचे  ग्राम महसूल अधिकारी विद्या मुंढे, वाघोली चे ग्राम महसूल अधिकारी आशुतोष देवगिरे,पुरवठा विभागाचे रेशन दुकानदार, चालक ,आपले सरकार सेवा चालक ,आधार केंद्र चालक व नागरिक उपस्थित होते.उपस्थित होते.

 
Top