तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीर जिर्णोध्दार कामासाठी बंद केलेले श्रीगोमुख तिर्थकुंड पुजारी बांधवाचा मागणी नुसार प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी भाविकांसाठी श्रावणमासात खुले केल्याने भाविकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीगोमुख तिर्थकुंडात श्रीतिर्थक्षेञ काशी येथील पाणी येते असल्याने भाविक या पाण्याने हातपाय धुवुन मगच देविदर्शनार्थ जात जातात. आज सकाळपासून तीर्थ भाविकांसाठी आंघोळीसाठी तसेच हात पाय धुण्यासाठी चालू करण्यात आले आहे. याबद्दल मंदिर प्रशासनाचे भाविक व पुजारी बांधव आभार मानत आहेत.