तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंञ दिना पासुन आलेल्या सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांची मोठी गर्दी होत आहे. भाविकांच्या वाढत्या संखेच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीर प्रशाषणाने पहाटे 01 वाजल्या पासुन दर्शनार्थ खुले केले आहे.
श्रीतुळजाभवानी मंदीरात सध्या विकास काम चालु असल्याने धर्म दर्शन, देणगी दर्शन रांगा बंद केल्या आहेत. त्यामुळे मुख दर्शन रांगेतुन भाविकांना दर्शन दिले जात आहे. भाविकांनी मंदीर परिसर बाजार पेठ फुलुन गेली आहे. सध्या पावसाचा जोर वाढल्यामुळे भाविकांना भिजत देविदर्शनार्थ जावे लागत आहे. भारतीय स्वातंञ दिन शुक्रवार त्यानंतर सलग शनिवार, रविवार सुट्या पार्श्वभूमीवर भाविक खाजगी वाहनांनी येत असल्याने तुळजापूर शहरात वाहतुक नियोजन नसल्याने वाहतुक कोंडी निर्माण होवुन याचा फटका भाविकांना बसत आहे.