धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील आंबेहोळ येथील दलित बस्तीमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकास योजनेतून करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामावर ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. नुकत्याच पूर्ण झालेल्या या रस्त्याची केवळ दोन ते तीन दिवसांत चाळणीसारखी अवस्था झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
याबाबत सरपंच उपसरपंच सरफराज पापा शेख, दयानंद लोंढे, अलाउद्दीन शेख, जब्बार शेख, असीम शेख, चांद शेख, शाहरुख पठाण, रोहित शेख आदी ग्रामस्थांनी स्वाक्षरीसह निवेदन गटविकास अधिकारी, धाराशिव यांना सादर केले. निवेदनामध्ये रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम अभियंता मार्फत तपासून चौकशी करण्यात यावी, आणि काम निकृष्ट असल्याचे दिसून आल्यास संबंधित ठेकेदाराचे बिल तातडीने स्थगित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनासोबत ग्रामस्थांनी रस्त्याचे जिओटॅग फोटोही जोडले आहेत.