धाराशिव  (प्रतिनिधी)– साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अमोल भैया पेठे मित्र परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, गीत, कथा आणि लोकशाहीर वाणीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित घटकांच्या वेदना व संघर्षाला वाचा फोडली. त्यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या कार्यक्रमास भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, तसेच प्रवीण पाठक, उदय देशमुख, विलास सांजेकर, मेसा जानराव, नितीन शेरखाने, विलास लोंढे, किसन पेठे आदी मान्यवर उपस्थित होते.

अमोल भैया मित्र परिवाराचे संस्थापक अमोल पेठे व जयंती समारोह समितीचे अध्यक्ष अक्षय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. मित्र परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. कार्यक्रमात अण्णाभाऊंच्या जीवनप्रवासावर थोडक्यात माहिती देत, त्यांच्या ज्वलंत आणि क्रांतिकारी विचारांची आजच्या पिढीला गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.

 
Top