धाराशिव  (प्रतिनिधी)–  सहयोग मल्टीस्टेट पतसंस्था आणि वाहतूक विभाग कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने वनरक्षण दिनानिमित्त शहर पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला. पर्यावरण संवर्धन आणि हरित क्रांतीचा संदेश देत या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमास बेंद्रे (अप्पर पोलीस अधीक्षक)पंडित मुंडे पोलीस उपनिरीक्षक,घाटगीने तसेच सहयोग मल्टीस्टेट पतसंस्था धाराशिव शाखेचे शाखा व्यवस्थापक अविनाश गायकवाड, तसेच जिल्हा विकास अधिकारी, शाखा अधिकारी, क्षेत्र अधिकारी, विकास विस्तार अधिकारी यांसह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अविनाश गायकवाड म्हणाले, “वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. हा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असून आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे.” कार्यक्रमात विविध प्रजातींची झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प सर्वांनी केला.


 
Top