धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या दोन महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.

यानिमित्ताने सर्वप्रथम या दोन महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या कार्याची महती सांगण्यात आली. यानिमित्ताने प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी या दोन महापुरुषांविषयी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर मनीष देशपांडे यांच्या सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

 
Top