तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील सेवन गटात असलेले दुर्गेश पवार यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असून या प्रकरणात आतापर्यंत हा चौथा जामीन मंजूर झाला आहे.
आतापर्यंत या प्रकरणात एकूण 38 संशयित आरोपी निष्पन्न झाले असून, त्यामध्ये 22 जणांना अटक झाली आहे. तर 10 जण अद्यापही फरार आहेत. यामध्ये विनोद गंगणे, आलोक शिंदे व उदय शेटे यांच्यासह सहा जणांना जामीन मंजूर आहे. यानंतर या प्रकरणात सेवन गटातील असलेले संशयित आरोपी दुर्गेश पवार यांना जामीन मंजूर झाला आहे. दुर्गेश पवार यांच्यावतीने ॲड. संजय पवार तुळजापूर यांनी बाजु मांडली. उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ॲड. महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.