धाराशिव (प्रतिनिधी)-  यशोदा जशी श्रीकृष्णाला वाढवते तसे अंकुरचे मातृत्व आहे असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष तथा श्री सिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ता कुलकर्णी यांनी केले. ते  अंकुर शिशुगृह,धाराशिव येथे नुकताच दत्तक विधानाचा हृदयस्पर्शी सोहळा संपन्न झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. 

या सोहळ्यात केवळ चार महिन्यांचे बालक एका प्रेमळ कुटुंबाच्या मायेच्या कुशीत दाखल झाले. निराधारतेच्या अंधारातून कुटुंबाच्या आधाराकडे जाणाऱ्या या प्रवासाने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल सहकारी पतसंस्थेचे संस्थापक विक्रम पाटील, नगरसेवक तथा तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळ अध्यक्ष विशाल रोचकरी, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. गोविंद कोकाटे हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.रमेश दापके, डॉ.दिग्गज दापके, डॉ. अर्शद रजवी, डॉ.वसुधा दापके, दिपाली दत्ता कुलकर्णी, राजश्री विक्रम पाटील, गणेश वाघमारे, प्रा. सोमनाथ लांडगे, इश्वर राठोड, शोएब शेख, फेरोज पल्ला, गजानन पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात दत्ता कुलकर्णी यांनी “यशोदा जशी श्रीकृष्णाला मायेने वाढवते, त्याचप्रमाणे दत्तक कुटुंबे निराधार बालकांना प्रेम,संस्कार व नवे जीवन देतात” असे सांगत दत्तक प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील विविध स्तरांतून अंकुर शिशुगृहाच्या या जीवनदायी उपक्रमासाठी शुभेच्छा व आशीर्वाद व्यक्त करण्यात आले. यावेळी मान्यवर व्यक्तींनी आपल्या वाढदिवसानिमित्त संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. 

 
Top