तुळजापूर (प्रतिनिधी)- यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने 100/200 मीटर रनिंग स्पर्धेचे आयोजित करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास(दादा) बोरगांवकर साहेबांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून हिरवा झेंडा दाखवत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण भाले यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. नागनाथ कदम यांनी केले.
100 मीटर धावणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अक्षय धोत्रे, द्वितीय रेहान सिद्दिकी, तृतीय शिवरत्न जाधव, 100 मीटर धावणे मुली या गटात प्रथम प्रेमा माने, द्वितीय धरती नरवडे तृतीय श्रद्धा राठोड, दोनशे मीटर धावणे मुले गट प्रथम मोहन सिरसठ, द्वितीय शिवरत्न जाधव, तृतीय सुरज माळी, 200 मीटर धावणे मुली गटात प्रथम नम्रता माने द्वितीय श्रावणी निचळ तृतीय दिव्या नाईकवाडी या विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगांवकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड, उपप्राचार्य डॉ. प्रवीण भाले, उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे, क्रीडा प्रमुख डॉ. अशोक कांबळे, प्रा. डॉ. अनिल शित्रे, प्रा. डॉ. गोविंद काळे, डॉ. मनोज झाडे, रा. से. यो. प्रमुख प्रा. राजेश बोपलकर, डॉ. नागनाथ कदम, प्रा. स्नेहा ठाकूर, डॉ. विनयकुमार चौधरी, डॉ. अंबादास बिराजदार, डॉ. प्रशांत अमृतराव, डॉ. शिवाजी जेटिथोर, डॉ. मंदार गायकवाड, डॉ. आमोद जोशी, डॉ. अजय मुंढे, डॉ. धर्मराज पवार इतर प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग यावेळी उपस्थित होते.
