धाराशिव (प्रतिनिधी)-पालकमंत्री प्रताप सरनाईक हे स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन दिवसांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट या दोन दिवसात ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सरनाईक हे मुंबईवरून खाजगी विमानाने लातूरकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता लातूरला आगमन होईल. सकाळी सव्वा अकरा वाजता लातूर येथील गौरी शंकर हॉल येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतील.

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला खूप महत्व आहे. सरनाईक हे दुपारी १२.३० वाजता लातूरहून कळंब तालुक्यातील खामसवाडीकडे प्रयाण करतील. खामसवाडी येथे स्वर्गीय दत्तात्रय उर्फ अनिल गुंड यांच्या कुटूंबास सांत्वनपर भेट देतील.

दुपारी २.३० ला परांड्याला जातील आणि ४.३० वाजता शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ताअण्णा साळुंखे यांची सांत्वनपर भेट घेतील. सायंकाळी ते धाराशिव शहरात येतील आणि ६.४५ वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देतील. रात्री ८ वाजता महादेव गल्ली येथील कपालेश्वर मंदीरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत.

त्यांचा रात्रीचा मुक्काम शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथे असणार आहे. दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वा.

भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त “ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ “कार्यक्रमास उपस्थिती लावतील. सकाळी १० वाजता नियोजन भवन येथे धाराशिव जिल्हा वार्षिक नियोजन मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतील.

त्यानंतर सकाळी ११ वाजता नियोजन भवन येथेच तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवाच्या संदर्भात आढावा बैठक घेतील. सकाळी ११.३० वाजता नियोजन भवन येथेच धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक.

दुपारी १२ वाजता धाराशिव शहरातील “मराठा समाज भवन” च्या जागा निश्चिती संदर्भात बैठक. दुपारी १२.३० वाजता श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदीर विकास आराखडा राबविताना विस्थापित पुजाऱ्यांना जागा निश्चित करण्याबाबत आढावा बैठक घेतील. दुपारी १ वाजता मोटारीने सोलापूरकडे प्रयाण करतील. तिथून दुपारी ३ वाजता खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

 
Top