तुळजापूर (प्रतिनिधी)- तलवार चोरी बातमी . पूर्णपणे निराधार आणि चुकीच्या” असल्याचे स्पष्ट करुन, ती पूर्णपणे सुरक्षित व सुस्थितीत असून याबाबतच्या अफवांना लोकांनी बळी पडू नये. अशी माहीती मंदीर प्रशासनाने दिली.
श्री तुळजाभवानी मंदिरातील विविध विकास, जतन व संवर्धनाच्या कामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर वास्तूतील आत्मबल वृद्धिंगत व्हावे, तसेच जिर्णोद्धार प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी यासाठी 16 जून 2025 रोजी विशेष धार्मिक विधी पार पडला. वाराणसी (काशी) येथील पद्मश्री प.पू. गणेश्वर द्रावीड शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हवृंद, महंत, पुजारी वर्ग, सेवेकरी, कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत दुर्गासप्तशती संपुटीत अनुष्ठान संपन्न झाले.
या विधी दरम्यान वापरण्यात आलेली पवित्र तलवार दैनंदिन पूजेच्या अनुषंगाने वाकोजीबुवा मठाचे मठाधिपती महंत तुकोजीबुवा गुरु बजाजीबुवा यांच्या ताब्यात देण्यात आली होती. सध्या तिची नित्यपूजा वाकोजीबुवा मठात महंत तुकोजीबुवा गुरु बजाजीबुवा यांच्या हस्ते केली जात आहे.
मात्र, 2 ऑगस्ट 2025 रोजी काही प्रसारमाध्यमांतून “तलवार चोरी”च्या बातम्या समोर आल्या. मंदिर प्रशासनाने या बातम्या “पूर्णपणे निराधार आणि चुकीच्या” असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाने सांगितले की तलवार ही वाकोजीबुवा मठातच आहे, ती पूर्णपणे सुरक्षित व सुस्थितीत असून याबाबतच्या अफवांना लोकांनी बळी पडू नये.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बोगस खतनिर्मितीचा कारखाना बंद करण्याची मागणी
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील तामलवाडी येथील गेली वर्षभरापासून बोगस खतनिर्मितीचा कारखाना खुलेआम सुरू असुन तो बोगस खतनिर्मितीचा कारखाना कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी केली जात आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये बोगस खतनिर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आले असुन तो बोगस खतनिर्मितीचा कारखाना कायमस्वरूपी बंद करावा. आशा आशयाची मागणी जिल्हाधिकारी सह संबंधित अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.