तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र जिवन प्राधिकरण धाराशिव कार्यालयातील भ्रष्टाचाराची तपासणी करण्यासाठी विभागीय चौकशी समिती नेमण्यात यावी.

प्रामुख्याने तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, अपसिंगा योजना पंधरा दिवसात तपासण्यात यावी. अन्यथा मुख्य अभियंता छत्रपती संभाजी नगर  यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा इशारा जिल्हाध्यक्ष अमीर शेख समाजवादी पार्टी  यांनी  मुख्य कार्यकारी अभियंता एमजीपी  कार्यालय संभाजीनगर यांना निवेदन देवुन दिला.


 
Top