धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले मंडळ ,धाराशिवचा  महाराजा व मानाचा  गणपती म्हणून गणल्या गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी  पाऊस काळ चांगला झाल्या नंतर ऑगस्ट,- श्रावण महिन्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्ष धाराशिव लेणी येथील परिसरामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले पडलेली घाण काढून ,प्लास्टिक बाटल्या ,पिशव्या व विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची पडलेली घाण ही स्वच्छ करण्याचं अभियान राबविण्यात आली. यापूर्वी मंडळांनी धाराशिवातील हातलादेवी, धारासुर मर्दिनी, रामलिंग मंदिर परिसरांमध्ये वृक्षारोपण व स्वच्छता अभियान मंडळांनी राबविले आहे.

 हरित धाराशिव अभियान मध्ये वृक्ष लागवडीसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदीसाठी  जिल्हाधिकारी श्रीमान पुजार यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन प्रा.गजानन गवळी व समर्थ असोसिएट यांच्या 20 एकराच्या  जमिनीवर हजारोंनी झाडे लावण्याचा उपक्रम मंडळाने आज प्रा. गजानन गवळी ,व शिवछत्रपती पुरस्कते राजकुमार दिवटे ,जिल्हा वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ. व गिरीश पाळणे उद्योजक व प्रगत शेतकरी यांच्या शुभहस्ते वृक्ष लावण्याचे शुभारंभ करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांमध्ये तीन वर्षापासून ते 78 वर्षाच्या वयापर्यंतच्या गणेश भक्त, गणेश दूत , गणेश सेवक व मंडळाचे पदाधिकारी यांनी फार मोठं परिश्रम घेऊन स्वच्छता व वृक्ष लागवडीचा उपक्रम यशस्वी केला .दुपारी दोन वाजता धाराशिव लेणी परिसरामध्ये निसर्गाने निर्माण केलेला,

 निसर्गमय परिसरामध्ये धरती, आकाश, तळ ,पाणी निसर्गाचे देण, इत्यादी पाहून चार तासाचा वेळ कसा गेला 50 ते 60 या लहान मोठ्या कार्यकर्त्यांच्या लक्षात देखील आले नाही .एवढे रमून गेले होते .याचवेळी बालाजी शेवाळे यांनी कोकणातून खास आंबा व नारळाचे विविध रोपे आणून दहा एकराच्या परिसरामध्ये 2000 झाडे कुमठा व वरवंटी या भागात मंडळाच मुख्य उद्देश प्रदूषणमुक्त व पर्यावरणास उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमा अंतर्गत वृक्ष लागवड व स्वच्छता  अभियान  अनेक वर्षापासून राबवित आहे. श्रीमान पुजार जिल्हाधिकारी यांच्या हरित धाराशिव अभियानामध्ये सहभागी होऊन, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जिल्हाधिकाऱ्यां च्या कार्यास सहकार्य व धाराशिव जिल्ह्याचे नाव उज्वलते कडे घेऊन जाणाऱ्या  अधिकाऱ्यास  मंडळाकडून मदत केली जात आहे. लेणी या परिसरामध्ये भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव ,जय भवानी,,- जय शिवाजी, आई राजा उदो उदो ,आशा विविध घोषणाने या निसर्गरम्य परिसरामध्ये आनंदाने व प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये दणाणून गेले होते.  मोहीम व अभियान यशस्वी करण्यामध्ये महिला विभागातील रेणुका गवळी, चित्रलेखा दिवटे, जानगवळी, नम्रता हुच्चे. गौरी उपाध्ये, चव्हाण सई, ईश्वरी पाळणे, दुर्गेश दिवटे, आकाश महामुनी, राहुल गवळी, वरून साळुंखे, सालपे, विश्वास दळवी, श्रीकांत दिवटे, मनोज अंजीखाणे, युवराज हुच्चे, अतुल ढोकर, वैभव अंजीखाने इत्यादी छोटे-मोठे सर्व सहकारी इत्यादींनी परिश्रम घेतले प्रा. भालचंद्र हुच्चे यांच्या नियोजन पूर्ण मार्गदर्शनाखाली अभियान राबविले.

 
Top