भूम (प्रतिनिधी)- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. या अभियानातंर्गत भुम शहरात भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. शहराच्या प्रमुख मार्गाने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक,  पदाधिकाऱ्यांनी तिरंगा रॅली काढून ध्वजाला सलामी दिली.

गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी भूम शहरातील सर्व पक्षिय, संघटना पदाधिकारी, इतरही नागरिक,  कार्यकर्त्यांनी शालेय विद्यार्थ्यां समवेत देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत  शहरातून तिरंगा रॅली भुम नगर परिषद,  गांधी चौक, बागवान गल्ली, बाजार रोड, आण्णाभाऊ साठे चौक, गोलाई चौक, ओंकार चौक या मार्गाने रॅली काढण्यात आली,  या रॅलीला नागरिकांसह शहरातील सरस्वती प्राथमिक शाळा भूम, रवींद्र हायस्कूल भूम व जिल्हा परिषद प्रशाला भूमच्या शाळा विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेच्या युनिफॉर्मसह सहभाग घेऊन  उस्फूर्त प्रतिसाद दिला. भारत माता की जय, वंदे मातरम्‌‍ या गगनभेदी घोषणांनी, हवेत लहरणाऱ्या झेंड्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झाले.

 या तिरंग्याच्या प्रत्येक रंगात आपली अस्मिता, संघर्ष आणि विजयाची कहाणी दडलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या अभियानाने आज संपूर्ण देश एकतेच्या धाग्यात गुंफला आहे.

या तिरंगा रॅलीसाठी बाळासाहेब क्षिरसागर, संतोष सुपेकर, महादेव वडेकर,  प्रदीप साठे, बाबासाहेब वीर, माजी सैनिक तालुका अध्यक्ष हेमंत देशमुख,  शिवाजी चव्हाण, संदीप खामकर, लक्ष्मण भोरे, मारुती चोबे, चंद्रकांत गवळा, आबासाहेब मस्कर, शुभम खामकर,  मुकुंद वाघमारे,  रघुनाथ वाघमोडे, सिद्धार्थ जाधव, आकाश शेटे, हभप बन्शी काळे महाराज, सुब्राव शिंदे, अतुल अंधारे, विभीषण पवार,  महादेव शेंडगे, निलेश शेळके यांच्यासह तीन शाळेच्या विद्यार्थी, शिक्षक,  मुख्याध्यापकांनी पुढाकार घेतलेला दिसत होता.

 
Top