धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये 79 स्वातंत्र्य दिन  विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला .

प्रथम प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत , ध्वज गीत , महाराष्ट्रगीत झाले तर राष्ट्रभक्तीपर गीत संगीत शिक्षक महेश पाटील व त्यांच्या बालचमूने सादर केले .राष्ट्रध्वजाला एनसीसी व स्कॉऊड व गाईड च्या ए .व्ही . शेंडगे व विश्वास शेवाळे व त्यांच्या संघाने मानवंदना दिली.

त्यानंतर संस्थाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते दिपक पाटील यांचा विदयार्थ्यांच्या रस्ते वाहतुकीबाबत केलेल्या योगदानाबद्दल  संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच शैक्षणिक वर्ष 2024 - 25 या वर्षात एकही रजा न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार त्यांनी केला. त्यामध्ये प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , विज्ञान अध्यापक तथा गुणवत्ता सुधार प्रमुख मनोज भुसे यांचा समावेश होता.

  त्यानंतर प्राचार्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थितांना संदेश देताना स्वातंत्र्याचे महत्त्व आपल्या खास शैलीत समजावून सांगितले.  यावेळी संस्थाध्यक्ष सुधीर पाटील , सचिव  प्रेमाताई पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, डॉ .सौ . मंजुळाताई पाटील , संस्था सदस्य यु .व्ही. राजे, पी.एल. गाडे, संतोष कुलकर्णी, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, सेवानिवृत्त शिक्षक राष्ट्रपती पारितोषिक विजेते विज्ञान शिक्षक युसूफ पठाण, अरूण बोबडे , घाटगे, एन.एल. गोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , पर्यवेक्षक यशवंत इंगळे , सुनील कोरडे , श्रीमती बी .बी . गुंड , राजेंद्र जाधव , बालाजी गोरे , मोहनराव शिंदे , के .के .कोरके, विनोद आंबेवाडीकर तसेच सर्व शाखेचे प्रमुख , कर्मचारी, विदयार्थी नवीन गणवेशात   मोठया संख्येने उपस्थित होते . शेवटी  देशभक्तीपर गीतावर कवायत व गुरुवर्य के .टी . पाटील सरांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली तर शेवटी  मुलांना अल्पोहार  देण्यात आला.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील , जममाला शिंदे  यांनी केले तर सर्वांचे आभार उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी मानले.   या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा  पर्यवेक्षक सुनील कोरडे यांनी केले ,त्यांना क्रीडा शिक्षक विक्रम सांडसे , लक्ष्मण सांळूके , अभिजीत पाटील , क्रीडा विभाग प्रमुख प्रवीण बागल व त्यांचे सर्व सहकारी तसेच  नाईक  सुहास  ताटे सर्व शिपाईवृंद  यांचे सहकार्य लाभले   कलाध्यापक शेषनाथ वाघ , सुरज सपाटे , शिवाजी भोसले यांनी या कार्यक्रमाची  क्षणचित्रे टिपली.

 
Top