नळदुर्ग (प्रतिनिधी)- सन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीकरीता लढा देणाऱ्या ज्या व्यक्तींना कारावास भोगावा लागला. अशा व्यक्ती जानेवारी 2018 पुर्वी हयात नसल्यास त्यांच्या पश्चात्या हयात जोडीदार पती /पत्नी केवळ अशा व्यक्तींना मानधन मिळण्याकरीता 15 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासन पुरक पत्रासोबतच्या परीशिष्ट ब मधील शपथपत्र जोडुन नळदुर्ग येथील अप्पर तहसिल कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे. असे आवाहन नळदुर्ग अप्पर तहसिल कार्यालयाचे अप्पर तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.
1975 ते 11977 या आणीबाणीच्या कालावधीत लोकशाही वाचविण्यासाठी ज्यांनी कारावस भोगला आहे. अशा व्यक्ती 2 जानेवारी 1018 पुर्वी हयात नसल्यास त्यांच्या पश्चात्य त्यांचे हयात जोडीदार पती /पत्नी केवळ अशा व्यक्तींनाच मानधन मिळण्याकरीता अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख ही 15 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासन पुरक पत्रासोबतच्या परीशिष्ट ब मधील शपथपत्र शासन निर्गमित झाल्याच्या तारखेपासुन 90 दिवसांपर्यंत राहणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही परीस्थितीत 25 सप्टेंबर 2025 नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेऊ नये असे सुचित करण्यात आल्याने नळदुर्ग शहर व परीसरातील ज्या व्यक्तींनी आणीबाणी काळात लोकशाही वाचविण्यासाठी करावास भोगला आहे अशा व्यक्ती 2 जानेवारी 2018 पुर्वी हयात नसल्यास त्यांचे हयात जोडीदार पती /पत्नी यांनी दि. 25 सप्टेंबर 2025 पुर्वी नळदुर्ग येथील अप्पर तहसिल कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत असे आवाहन अप्पर तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.